नागपुरमध्ये महिला पोलिसावर बलात्कार

अनिल कांबळे
शनिवार, 26 मे 2018

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (२७) रा. सीबना को-ऑपरेटिव्ह सोसायटी, गोधनी असे आरोपीचे नाव आहे. 

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून पोलिस शिपायाने सहकारी महिला पोलिस शिपाई महिलेवर बलात्कार केला. हा गंभीर प्रकार मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत समोर आला.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पवनसिंग विनोदसिंग ठाकूर (२७) रा. सीबना को-ऑपरेटिव्ह सोसायटी, गोधनी असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित ३० वर्षीय पीडित महिला शिपाई व आरोपी एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त दोघांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री व दीड वर्षांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमात त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. घरात कुणीच नसताना तिला घर दाखवले व तिच्यावर बलात्कार केला. याविरुद्ध तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: rape on police in Nagpur