बलात्कारी, दरोडेखोरांना संचित रजा नाही 

नीलेश डोये / अनिल कांबळे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - मध्यवर्ती कारागृहातून संचित रजा, अभिवचन रजेवर बाहेर आलेले कैदी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने यापुढे बलात्कार, दरोडा, खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना दोन्ही रजा दिल्या जाणार नाहीत. तशी सुधारणा नियमात करण्यात आली आहे. 

नागपूर - मध्यवर्ती कारागृहातून संचित रजा, अभिवचन रजेवर बाहेर आलेले कैदी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने यापुढे बलात्कार, दरोडा, खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना दोन्ही रजा दिल्या जाणार नाहीत. तशी सुधारणा नियमात करण्यात आली आहे. 

संचित रजेसाठी कैद्यास कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यांच्याकडून अर्ज फेटाळल्यास अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक व कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे अपिल करता येईल. 30 दिवसांच्या आत त्यांना आपला निर्णय घ्यावा लागेल. संचित रजेचा लाभ एक वर्ष ते पाच वर्षांची शिक्षा झालेल्या कैद्यास मिळेल. ही रजा वर्षाला 21 ते 28 दिवसांपर्यंतची असेल. एकदा रजा मिळाल्यावर सहा महिन्यांपर्यंत रजा मिळणार नाही. संचित रजेसाठी जामिनाची रक्कमही घेण्यात येईल. यासाठी संबंधित नातेवाइकाचीही माहिती घेण्यात येईल. तसेच संचित रजेदरम्यान ज्या गावात, शहरात राहणार त्या संबंधित पोलिस स्टेशन आणि जिल्हाधिकारी यांनाही याची माहिती जाणार आहे. अभिवचन रजा 45 ते 60 दिवसांपर्यंत असेल. घराच्या मंडळीचा मृत्यू, विवाह प्रसंग यासाठी 14 दिवसांची तातडीची अभिवचन रजा मिळू शकेल. विभागीय उपमहानिरीक्षक हे यासाठी सक्षम प्राधिकारी असतील. आई, वडील, पत्नी, मुलांचा आजार, पत्नीची प्रसूती यासाठी अभिवचन रजा मिळणार असून पाच वर्षांपेक्षा शिक्षा असणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. 

विशेष म्हणजे कैद्याकडून देणाऱ्या अर्जातील कारणाची चौकशी होईल. उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी कारणांची तपासणी करून अहवाल देतील. या अहवालच्या आधारेच अभिवचन रजा मंजूर होईल. अभिवचन रजा मंजूर झाल्यानंतर आठवड्यातून दोन दिवस संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. 

या कैद्यांना मिळणार नाही रजा 
कारागृह अधीक्षकांच्या मते गुन्हेगारी वृत्तीकडे कल असणारे कैदी 
सरकारकडून सोडण्यास परवानगी नसलेले 
सार्वजनिक शांततेला धोका उत्पन्न करणारे 
कारागृहात मारामारी, हल्ला, दंगा, उठाव करणारे 
कारागृहातून पळून जाणारे, प्रयत्न करणारे 
बलात्कार, बलात्कारासह हत्या, बलात्काराच्या प्रयत्नासह हत्या करणारे 
दरोडा, दहशवादी कारावाया, राज्याविरुद्ध दंड, खंडणीसाठी अपहरण 
मानसिकदृष्ट्या आजारी 
निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करण्याची शक्‍यता असलेले 
बालकांवरील लैंगिक अपराध किंवा मानव तस्करी करणारे 

Web Title: rapists the robbers do not get accumulated leave