रतन टाटांनी घेतली सरसंघचालकांची भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नागपूर - टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून टाटा यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. मात्र, भेटीचा हा योग टाटा यांच्या जन्मदिनी आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस "स्पेशल' ठरला.

नागपूर - टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून टाटा यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. मात्र, भेटीचा हा योग टाटा यांच्या जन्मदिनी आल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस "स्पेशल' ठरला.

एकीकडे टाटा संघाच्या सामाजिक प्रकल्पांमध्ये कार्य करण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात असतानाच दुसरीकडे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही सदीच्छा भेट असल्याचे सांगितले. रतन टाटा यांचे दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ते रेशीमबागेतील स्मृतिमंदिरला गेले. तेथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले. या वेळी महानगर संघचालक राजेश लोया यांनी स्मृतिमंदिर परिसराची तसेच संघाच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. टाटांसोबत भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. उपस्थित होत्या. दुपारी तीन वाजता रतन टाटा, शायना एन. सी. महालातील संघ मुख्यालयात गेले. मुख्यालयी त्यांनी सरसंघचालकांसोबत बंदद्वार चर्चा केली. उभयंतांमध्ये झालेल्या चर्चेबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे.

सेवाकार्याची घेतली माहिती
रतन टाटा यांनी या भेटीत आदिवासी भागात सुरू असलेले संघाचे काम जाणून घेतले. तसेच यामध्ये योगदान देण्याबाबत इच्छा व्यक्त केली, तर सरसंघचालकांनी टाटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विदर्भ

नागपूर - धंतोलीच्या गल्ल्यांमधील ‘ब्लॉकेज’ काढल्यानंतर तशाच पद्धतीचा वापर वाहतूक शाखेतर्फे धरमपेठेत गुरुवारपासून केला जात...

09.18 AM

नागपूर - पाचपावलीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि बिर्याणी हॉटेल मालक अब्दुल्ला खान सईमुल्ला खान (वय ५०, रा. नवी वस्ती...

09.18 AM

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपुर्णा नदीत ट्रक पलटी होऊन दोघे जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी (ता.17) सकाळी 4...

08.54 AM