दिव्यांग प्रादेशिक केंद्र नागपूरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नागपूर - शहरात दिव्यांगांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या उभारणीसाठी मौजा जाटतरोडी येथील 22 हजार 320 चौरस मीटर जमीन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज या संस्थेला देण्यास महाराष्ट शासनाच्या महसूल व वनविभागाने मान्यता दिली. 

नागपूर - शहरात दिव्यांगांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या उभारणीसाठी मौजा जाटतरोडी येथील 22 हजार 320 चौरस मीटर जमीन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज या संस्थेला देण्यास महाराष्ट शासनाच्या महसूल व वनविभागाने मान्यता दिली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्यांगासाठी प्रादेशिक केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिव्यांगासाठी घेण्यात आलेल्या शिबिरात दिले होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी केंद्रासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मागणीची दखल घेतली व या संदर्भातील निर्णय शासनाने 15 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. राज्य शासनाने 4 जानेवारी रोजी शासन मान्यतेचे परिपत्रक जारी केले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज या संस्थेने नागपूर येथे दिव्यांगांसाठी संयुक्त प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यास 5 एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची विनंती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना केली होती. राज्य शासनाने या जागेला मान्यता देताना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून जागेचे नूतनीकरण व भाडेपट्ट्याची तरतूद केली आहे. वार्षिक 1 रुपया नाममात्र दराने ही जमीन 30 वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. जमिनीचा वापर मंजूर असलेल्या प्रयोजनासाठीच करता येणार आहे. 

विकास साधण्यास होणार मदत 
प्रादेशिक केंद्रामुळे दिव्यांग व्यक्तींची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमी विचारात घेऊन त्यांचे पुनर्वसन, विशेष शिक्षण व प्रशिक्षण आदींच्या माध्यमातून रचनात्मक मनुष्यबळ विकास साधने, दिव्यांग व्यक्तीबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, राज्यातील दिव्यांग व्यक्तींचा विकास साधण्यास या केंद्रामुळे मदत होणार आहे.

विदर्भ

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त शेगाव (बुलढाणा): यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा राहणार आहे. त्यामूळे...

06.48 PM

धंतोली झोनने हटविली दुकाने - मांस, चिकन जप्त नागपूर - पोळ्याच्या पाडव्याची संधी साधत अनेकांनी आज रस्त्यांच्या बाजूलाच...

11.00 AM

चौकातील हौदांवर नागरिक संतप्त - ‘सोशल मीडिया’वर काढले महानगरपालिकेचे वाभाडे नागपूर - फक्त सिमेंट रोड केले जात आहेत. सदोष...

11.00 AM