धार्मिक मिरवणुकीवरून मलकापुरात जाळपोळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मलकापूर : विनापरवानगी मिरवणूक काढून देशविरोधी घोषणा दिल्याने येथील सालीपुरा भागात आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास तणाव निर्माण झाला. काही समाजकंटकांनी दगडफेक सुरू केल्यावर प्रक्षुब्ध जमावाने शहरात जाळपोळ केली.

जमावाच्या दगडफेकीमध्ये आमदार चैनसुख संचेती, नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍड. हरीश रावळ, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सोळंके यांच्यासह वीस जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडून जमावाला पांगवले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बुलडाणा येथून पोलिस कुमकेला पाचारण करण्यात आले. शहरात संचारबंदी घोषित केली असून, सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून धार्मिक मिरवणुकींदरम्यान मलकापुरात तणाव निर्माण होतो, त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून पोलिसांनी काही विशिष्ट मार्गांवरून मिरवणूक काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, 30 ते 35 युवकांनी परवानगी न घेता मोटारसायकल रॅली काढून देशविरोधी घोषणा दिल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही जणांनी वाद घातला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. याची माहिती शहरात पसरताच तणाव निर्माण झाला. दगडफेक व जाळपोळ सुरू झाली. जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. शांततेचे आवाहन करण्यासाठी गेलेले आमदार चैनसुख संचेती, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रावळ, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंके हे दगडफेकीत जखमी झाले. अखेर बुलडाणा येथून दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले. शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली.

Web Title: religious violence in malkapur