खडसे यांचा बचाव अविश्‍वसनीय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भूखंड खरेदी प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे आपल्याला या प्रकरणी काहीच माहीत नाही, हा त्यांचा बचाव अविश्‍वसनीय असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वकिलांमार्फत करण्यात आला. 

नागपूर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भूखंड खरेदी प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे आपल्याला या प्रकरणी काहीच माहीत नाही, हा त्यांचा बचाव अविश्‍वसनीय असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वकिलांमार्फत करण्यात आला. 

पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमिनीची खरेदी बेकायदेशीरपणे खडसे यांच्या नातेवाईकांनी केल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्या. दिनकर झोटिंग यांची एकसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी युक्तिवाद केला. एमआयडीसीची बाजू मांडताना ॲड. जलतारे म्हणाले की, भोसरी भूखंड खरेदीप्रकरणी एकनाथ खडसे यांचा सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. उकानी यांना मोबदला न मिळाल्याने भोसरी येथील भूखंड विकण्याचा अधिकार होता, असा युक्तिवाद खडसे यांनी केला होता. या बचावात काही दिवसांनी खडसे यांनी बदल केला. या प्रकरणी आपल्याला काहीच माहीत नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. परंतु, हा बचाव अविश्‍वसनीय असून, स्वतः एकनाथ खडसे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक २३ फेब्रुवारी २०१६ रोजी बंगल्यावर बोलाविली होती. त्यानंतर २८ मार्च २०१६ रोजी सौ. खडसे व त्यांचे जावई चौधरी यांना कोलकाता येथे जाऊन अग्रिम रक्कम देण्यात आली. ही वस्तुस्थिती असताना या भूखंड विक्रीची आपल्याला काहीच माहिती नाही, हा एकनाथ खडसे यांचा बचाव अविश्‍वसनीय असल्याचे ॲड. जलतारे यांनी या वेळी सांगितले. या युक्तिवादाला एकनाथ खडसे यांचे वकील उद्या (ता. ३) उत्तर देणार आहेत.

Web Title: The rescue of Khadse is incredible