जप्त केलेल्या 41 लाख रुपयांचा तपास आयकर विभागाकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कारंजा - येथील नागपूर-मुंबई महामार्गावर शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केलेली रोकड 41 लाखांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आयाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारंजा येथे तळ ठोकला आहे. या प्रकरणामध्ये 11 जणांना पोलिस व आयकर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कारंजा येथे नागपूर-मुंबई महामार्गावर एका हॉटेलजवळ तवेरा तसेच इनोवा गाडी व त्यामधून प्रवास करणाऱ्या 11 जणांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ नवीन दोन हजार रुपयांच्या व शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात रोख रक्कम असल्याचे आढळले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी या प्रकरणाची सूत्रे हाती घेऊन या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला पाठविली होती. आज (ता. 16) आयकर विभागाचे अधिकारी एस. एम. गावंडे व त्यांच्या चमूने रक्कम मोजली असता ही रक्कम 41 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन खेडकर (रा. यवतमाळ), परेश रामकृष्ण ठाकरे, अमित रामभाऊ बाकडे, सौरभ शुभम मोरिया, जगदीन मोरिया, सतीश भगत, रोहन गुप्ता, चंद्रशेखर तुसीदास मुदलियार, निखिल कुशल कुमोरिया, शुकपालीन लक्ष्मीनारायण, निखिल जैन (सर्व नागपूर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमरावती विभागाचे आयकर अधिकारी एस. एम. गावंडे व त्यांची चमू चौकशी करीत आहे. याबाबत अजून आयकर विभागाने कोणताही अहवाल दिला नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.