ग्रामीण भागातील घरे होणार प्रकाशमान

Electricity
Electricity

नागपूर - राज्यातील ४१ हजार ९२८ गावे, ९८ हजार ३५६ वाड्यापाडे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांमध्ये वीज पोहोचली आहे. सौभाग्य योजनेत नव्याने १११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवायही उर्वरित सर्वच वाड्यापाडे व घरांना सौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून वर्षअखेरपर्यंत वीज जोडणी दिली जाणार आहे. 
राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहे.  त्यापैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे. 

उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दीनदयाल योजनेअंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. 

वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची गरज असणाऱ्या ठिकाणी विविध योजनांमधून निधी मिळवून तसेच दुर्गम भागात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे. 

राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी  महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा किंवा १९१२, १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

उर्वरितांना डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी
मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांमध्ये वीज पोहोचविली आहे. यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील वाड्यापाड्यांची संख्या सुमारे १ लाख ६ हजार ९३९ आहे. त्यापैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांत यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली असून,  उर्वरित १ हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दीनदयाल योजनेतून व ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com