लाखनीचे ग्रामीण रुग्णालय ऑक्‍सिजनवर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

लाखनी - तालुका मुख्यालयी असलेल्या लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा ऑक्‍सिजनवर आहे. रुग्णांची हेळसांड होत असून, लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहरात दररोज शेकडो रुग्ण येतात. शहरातील व ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. यात प्रसूतीसाठी, तपासणीसाठी येणाऱ्या महिला, लहान मुलांचे लसीकरण, आरोग्य तपासणी व उपचारासाठी येथे नेहमीच रुग्णांची वर्दळ असते. मागील दोन वर्षांपासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेला घरघर लागलेली आहे. 

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविले जाते. गरीब व गरजू रुग्णांना नाहकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला असून, त्यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होतात. अशात ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकदा जखमींवर उपचार होऊ शकत नाहीत. रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे व त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जाते. दरम्यान, गंभीर तसेच प्रकृती अधिक अस्वस्थ असल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय हे केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. 

ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे कायमस्वरूपी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हे ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवा देत आहेत. त्यामुळे लाखनी तालुक्‍यातील गरोदर माता, नवजात शिशू, अंगणवाडीतील बालकांची तपासणी व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी खोळंबलेली आहे. कायमस्वरूपी किमान 4 वैद्यकीय अधिकारी 24 तास नियुक्त करण्याची गरज आहे. त्यात स्त्री रोगतज्ज्ञांची नियुक्ती आवश्‍यक आहे. रुग्णालयातील एक्‍स-रे मशीनसुद्धा बंद आहे. एक्‍स-रे टेक्‍निशियन पद रिक्त आहे. रुग्णालयात जनरेटरची सोय नाही. त्यामुळे उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णांना उकाडा व गर्मीचा सामना करावा लागतो. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे कक्षसेवकपदसुद्धा रिक्त आहे. शवविच्छेदन करण्यासाठी भंडारा येथे पाठविले जातात. 

कंत्राटी डॉक्‍टरांवर धुरा 
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे (एक), वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. त्या पैकी वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक डॉक्‍टर भंडारा सामान्य रुग्णालय येथे प्रतिनियुक्तीवर गेले. तर एका डॉक्‍टरवर वैद्यकीय अधीक्षक पदाची प्रभारी जबाबदारी सोपविण्यात आली. एकच वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात लग्न असल्याने तेसुद्धा रजेवर आहेत. त्यामुळे येथे एमबीबीएस दर्जाचा एकही अधिकारी कर्तव्यावर नाही. विद्यार्थी आरोग्य तपासणी मोहिमेतील बीएएमएस डॉक्‍टरांची चमू सध्या ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. ओपीडीसह अन्य तपासणी व उपचार करताना त्यांची दमछाक होते. 

Web Title: rural hospital on oxygen