फुंडकराच्या जाण्याने वऱ्हाडात दुखःचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

अकोला - भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने वऱ्हाडातील राजकीय, सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही वार्ता खामगाव, बुलडाणा परीसरात वाऱ्यासारखी पसरली. सकाळी-सकाळी मिळालेल्या या बातमीवर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. सोशल मिडीयावरून येणारे संदेश मनात धडकी भरविणारे होते. सकाळी ७ ते १० या प्रत्येकजण या बातमीची सत्यता पडताडून पाहत होता. भाऊसाहेबांनी शेतकरी, शेतमजूर यासह कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. 

दरम्यान, गुरूवार (ता.३१) आयोजित सर्व राजकीय सामाजिक आंदोलने स्थगित केल्याचीही माहिती आहे.

Web Title: The sad atmosphere in vidarbha