१४ कोटींचे रक्तचंदन जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नागपूर - अजनीतील इंडियन कंटनेर डेपोतून (आयसीडी) तस्करी करण्यात येत असलेले १४ टन रक्तचंदन केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय किंमत १४ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नागपूर - अजनीतील इंडियन कंटनेर डेपोतून (आयसीडी) तस्करी करण्यात येत असलेले १४ टन रक्तचंदन केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय किंमत १४ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आयसीडीमधून मोठ्या प्रमाणावर तस्करीच्या मालाची आयात-निर्यात होत असल्याचे निदर्शनात आल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून मालाची तपासणी कसून करण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी सिगारेटची तस्करी पकडल्यानंतर आज रक्तचंदन पकडल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या चमूने शनिवारी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील पिरदा गावातील वंदना ग्लोबेक्‍स या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. त्यात १२ टन रक्तचंदन जप्त केले. तपासात रक्तचंदनाच्या कंटेनरची एक खेप मुंबईला पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. तशी माहिती नागपूर आयसीडीला देऊन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार कंटनेर रेल्वे स्टेशनवर येताच रविवारी ते ताब्यात घेण्यात आले. 

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ तपास अधिकारी अनिल पंडित यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनविभागाचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) केवल डोंगरे, सहाय्यक वनसंरक्षक उमाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने, वनपाल डी. डी.  चौधरी, सतीश गडलिंग, जयेश तायडे, वनरक्षक मनीषा पाटोळे सहभागी झाले होते.

सिमेंट व आर्यन स्पंजमध्ये रक्तचंदन
कंटनेरची तपासणी केली असता त्यात सिमेंट आणि आर्यन स्पंजमध्ये रक्तचंदन पाठविण्यात येत असल्याचे उघडकीस आले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू लगेच आयसीडीमध्ये पोहोचली. चमूने रक्तचंदनाची मोजणी केली.

Web Title: sandalwood seized

टॅग्स