अन् शाळा झाली शंभर वर्षाची...

संदीप रायपुरे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

विठ्ठलवाड्यातील शाळेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शाळास्थापनेचा शताब्दीमहोत्सव हा मोठाच विषय. 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शाळा विद्यार्थीच घडवित नाही.तर चांगला समाज निर्मितिसाठीही तिचा मोठा वाटा. समाजस्वास्थावर वैचारिक विकासाचा पाठ शिकवाणार्या गोंडपिपरी तालूक्यातील विठ्ठलवाडा गावातील शाळेला आज शंभर वर्ष पुर्णहोत आहेत.शाळास्थापनेच्या शताब्दीत कुणी मोठे राजकारणी कुणी समाजकारणी तर कुणी संशोधक झाले. गोंडपिपरी तालूक्यातील विठ्ठलवाडा गांव...ब्रिटीशांनी 1918 साली या गावात शाळा सुरू केली, अन् गावात फिरणाऱ्या चिमुकल्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले. पोर शिकु  लागली. अन् समजदार होऊ लागली.

विठ्ठलवाड्यातील शाळेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शाळास्थापनेचा शताब्दीमहोत्सव हा मोठाच विषय. शंभर वर्षात या शाळेत शिक्षण घेउन कुणी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष झाले. कुणी सभापती झाले तर कुणी संशोधक. शाळेतील शेकडो विद्यार्थी मास्तर झाले. डॉक्टरही झाले. पीएचडी एमफीलही झाले. गेल्या अनेक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना घडविणारी ही शाळा आज आपला शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे.

विठ्ठलवाडा शाळेच्या समृध्द शताब्दीचा हा वारसा येणाऱ्या पिढिला माहिती व्हावा हा उदात्त हेतू घेत आज मोठ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे आध्यक्ष देवराव भोंगळे, सिईओ पिंपळकर, यांच्यासह आमदार संजय धोटे क्रिष्णा सहारे पंचायत समितीचे सभापती दिपक सातपुते, सरपंच नितीन काकडे, जयेद्र अवथरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शाळेच्या शंभर वर्षानीमित्ताने काही खास उपक्रमही घेण्यात येणार आहेत. शंभर वर्षातील शाळेतील इतिहासाच्या  यशोगाथा विद्यार्थी हस्तलिखीत लिहिले असून ते पुस्तकरूपी प्रसिध्द होणार आहे. याशिवाय देशपातळीवर अभिनव प्रयोग करणारा शाळेतील विद्यार्थी शिवाय प्रयोगशील शेतकरी, संशोधक, राजकारणी, समाजकारणी यांच्यासह सुवर्णकारा, कलाकुसर व प्रयोगशील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.

'शाळेला शंभर वर्षाची समृध्द परंपरा आहे. यातून विविध क्षेत्र विद्यार्थ्यांनी पादाक्रांत केली आहेत. शाळेचा हा समृध्द वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे,' असे मत शाळेच्या मुख्यध्यापिका मंगला तोडे यांनी व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The school in Vitthalwad is completing hundred years