शाळांत पाण्याचा दुष्काळ

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

नागपूर - पाणी हे जीवन आहे असे शिकविणाऱ्या शाळांमध्येच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील १७० शाळांचा पाण्याची सोय नसल्याने दर दोन ते तीन दिवसांचा साठा जमा करून विद्यार्थ्यांची तहान भागवावी लागते.

नागपूर - पाणी हे जीवन आहे असे शिकविणाऱ्या शाळांमध्येच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांतील १७० शाळांचा पाण्याची सोय नसल्याने दर दोन ते तीन दिवसांचा साठा जमा करून विद्यार्थ्यांची तहान भागवावी लागते.

नागपूर शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांत जवळपास २१ हजारांवर प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात सुमारे १२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मैदान, प्रयोगशाळा आणि मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्या सोयी-सुविधा नसल्यास त्यांच्या मान्यता काढण्याइतपत अधिकार उपसंचालकांना देण्यात आलेले आहे. यासंदर्भात वारंवार उपसंचालकांकडून पथकाद्वारे तपासणीही करण्यात येते. प्रत्येक शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत एक परिपत्रक काढून सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनेकडे शाळांनी दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणे सुरू केले आहे.

नागपूर शहरासहित इतर जिल्ह्यांतील तब्बल १७० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची  सोय नाही. नागपुरात याची संख्या पाच असून, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ८३ शाळांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांक गोंदिया जिल्ह्याचा असून, तिथे ५६ शाळांमध्ये पिण्याच्या  पाण्याची सोय नाही. तर, दुसरीकडे वर्धा जिल्ह्याच्या एकाही शाळेचा समावेश नाही, हे विशेष. याबाबत उपसंचालकांना विचारणा केली असता, त्यांनी ही बाब गंभीर असून त्यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा   शाळांची संख्या

नागपूर        ०५

वर्धा          ००

भंडारा         ०४

गोंदिया        ५६

चंद्रपूर         १०

गडचिरोली      ८३

Web Title: Schools, water shortages