हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ अकाेल्यात

download.jpg
download.jpg

अकाेला :  डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचं मैदान तयार हाेणार आहे. त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणतर्फे हालचालींना गती आली असून, शुक्रवारी (ता.३१) मैदानाची माेजणी व इतर चाचण्या घेण्यात आल्या. हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचे हे राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय खेल प्राधिकरण (साई) औरंगाबाद व मुंबईचे उपसंचालक विरेंद्र भंडारकर हे बुधवारी (ता.२९) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आले हाेते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले आणि हॉकी अकाेलाचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील आणि सचिव धिरज चव्हाण यांनी हॉकीसाठी टर्फ मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर भंडारकर यांनी दाेन दिवसातच मुंबई येथील संदीप संघराजका यांना अकाेल्यात पाठविले. शुक्रवारी संघराजका यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हॉकी मैदानाची पाहणी करून माेजमाप केली. भारतीय खेल प्राधिकरणने या कामाला गती दिल्याने लवकरच अकाेल्यात ब्ल्यू टर्फचं सुसज्ज असं हॉकीचं मैदान तयार हाेईल. हॉकीचं हे मैदान विदर्भातील पहिलं मैदान ठरणार आहे.

यापूर्वी नागपूरने पाठविला हाेता प्रस्ताव
हॉकी मैदानात ब्ल्यू टर्फ बसविण्यासाठी यापूर्वी नागपूरमधून भारतीय खेल प्राधिकरणला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, त्या प्रस्तावाचे पुढे काहीच झाले नाही. मात्र, अकाेल्यातील प्रस्तावाला गती मिळाल्याने लवकरच येथील हॉकी मैदानाचं काम पूर्ण हाेणार असल्याचे हॉकी अकाेलातर्फे सांगण्यात आले.

राज्यात हॉकी मैदानांची स्थिती
राज्यात हॉकीचे एकुण तीन मैदान अाहेत. त्यात मुंबई आणि पुणे येथे ग्रीन टर्फ आहे, तर औरंगाबाद हॉकी मैदानात ब्ल्यू टर्फ आहे. सध्या आंतरराष्ट्रीयस्तरावर हॉकी मैदानावर ब्ल्यू टर्फचा वापर हाेत आहे. नव्या तंत्रज्ञानाचे हे ब्ल्यू टर्फ लवकरच अकाेल्यातील हॉकी मैदानात बसणार असून, ते राज्यातील चौथं हॉकीचं मैदान ठरणार आहे.

‘सकाळ’ने केला पाठपुरावा
हॉकी आणि फुटबॉल या दाेन खेळाच्या वादात हॉकीचं मैदान हरवल्याची बातमी ‘सकाळ’ने बुधवारी (ता.२९) आॅगस्टला प्रकाशीत केली हाेती. त्यानंतर भारतीय खेल प्राधिकरण औरंगाबादचे उपसंचालक विरेंद्र भंडारकर अकाेल्यात आले असता, लवकरच हॉकीमैदानात टर्फ बसविण्याचे आश्वासन दिले हाेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com