शिवसेना व मनसेने इतिहास चाळावा - श्रीहरी अणे

शिवसेना व मनसेने इतिहास चाळावा - श्रीहरी अणे

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात गुजरात, तमिळनाडू, ओडिशापर्यंत मराठ्यांचे राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे तुकडे होऊ देणार नाही, अशी भाषा करणाऱ्या शिवसेना व मनसेने इतिहास चाळावा, अशा शब्दात विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला. यावेळी त्यांनी 105 जणांनी मुंबईसाठीच हौतात्म्य पत्करले होते याचा पुनरुच्चार केला. 

राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश काकडे, अनिल जवादे आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या निर्मितीच्या काळात मुंबईत 52 टक्के लोक गुजराती भाषी होते. गुजरातला मुंबई हवी होती. विदर्भ संयुक्‍त महाराष्ट्रात सामील झाला नसता तर मुंबई गुजरातला गेली असती किंवा केंद्र शासित प्रदेश झाला असता. मुंबईसाठीच आंदोलन करण्यात आले होते. यात 105 जणांना हौतात्म्य आले. हे आंदोलन संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हते. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून विदर्भ वेगळे झाला पाहिजे. एका भाषेचे अनेक राज्ये आहेत. छोटे राज्य प्रदेशाच्या आणि लोकांच्या दृष्टिकोनातून सोयीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा छोट्या राज्यांचे समर्थक होते. शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवाद रोखण्यासाठी विदर्भ राज्य झाले पाहिजे, असेही अणे म्हणाले.

इकडचे नालायक, तिकडे चोर काय? 
दांडेकर समितीने 1984 च्या अहवालात विदर्भाचा अनुशेष 1250 कोटी दर्शविला होता. त्यानंतर 2000 मधील अहवालात हा अनुशेष 6 हजार 600 कोटी दर्शविण्यात आला. विदर्भाचा पैसा पश्‍चिम महाराष्ट्रावर खर्च करून विदर्भाला मागास ठेवण्यात आले. विदर्भाचे नेते नालायक आहेत, असे पश्‍चिम महाराष्ट्रवाले म्हणतात. पश्‍चिमच्या नेत्यांनी पैसा चोरून नेला. ते विदर्भाला महाराष्ट्र भाग समजत नाही, असेही अणे म्हणाले. 

15 टक्के काम 90 टक्के खर्च 
मराठवाडा आणि विदर्भातील 180 प्रकल्प रखडले आहेत. येथील प्रकल्पांचे 15 टक्के काम झाले असून खर्च मात्र 90 टक्के झाला. काम अपूर्ण असताना कंत्राटदारांना पैसे मात्र पूर्ण देण्यात आले. हा पैसा कुणाला गेला, हे महत्त्वाचे नसले तरी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे मत न्यायालयासमोर आपण मांडले होते. यामुळे त्यांना आपण महाधिवक्ता पदावर नको होते, असे ऍड. श्रीहरी अणे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com