ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

नागपूर - गेली पन्नास वर्षे सातत्याने वऱ्हाडी भाषेतील कवितांच्या माध्यमातून बोलीचा प्रचार प्रसार करणारे यवतमाळ येथील ज्येष्ठ कवी शंकर बडे (68) उर्फ काका बडे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले.

नागपूर - गेली पन्नास वर्षे सातत्याने वऱ्हाडी भाषेतील कवितांच्या माध्यमातून बोलीचा प्रचार प्रसार करणारे यवतमाळ येथील ज्येष्ठ कवी शंकर बडे (68) उर्फ काका बडे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले.

शंकर बडे यांना मंगळवारी ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला होता. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेत होते. गेली दोन दिवस ते स्थानिक संजीवन रुग्णालयात कृत्रीम जीवन प्रणालीवर होते. पण, अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आयुष्यभर मातीच्या आणि शेतकऱ्यांच्या कविता करणारा हा कवी पोळ्याच्याच दिवशी निघून जावा, हाही एक विलक्षण योगायोग मानला जात आहे. आर्णि येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. “मुगूट”सह त्यांचे अनेक कवितासंग्रह गाजले. गेली पाच दशके सातत्याने वऱ्हाडी कविता आणि किस्स्यांचे कार्यक्रम त्यांनी केले. “बॅरिस्टर गुलब्या” या पात्राच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शोककळा पसरली आहे.

विदर्भ

नागपूर : रामटेक तालुक्‍यातील खरपडा येथे शनिवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सूरज सदाशिव...

05.36 PM

१७९ रोपांची लागवड - ‘माय प्लॅंट’ ॲपवर करा नोंदणी  नागपूर - वनविभाग लोकसहभागातून एक ते सात जुलै या कालावधीत राज्यात ‘...

03.54 PM

नागपूर - शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे कृत्रिम दंतशास्त्र विभागात ‘कॅड-कॅम’ (कॉम्प्युटर असिस्टेड डिझाइन व कॉम्प्युटर...

03.54 PM