वाशीम : दानवेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शिवसेनेच्या वतीने वाशीम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीसमोर दानवेंच्या प्रतिकात्मक पूतळ्याला जोडे मारून भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीबाबत असभ्य वक्तव्य केले होते. 

वाशीम - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेल्या असभ्य वक्तव्याचे पडसाद आज (गुरुवार) वाशीम जिल्ह्यात उमटले.

शिवसेनेच्या वतीने वाशीम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीसमोर दानवेंच्या प्रतिकात्मक पूतळ्याला जोडे मारून भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीबाबत असभ्य वक्तव्य केले होते. 

दानवेंच्या विधानावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधे संताप व्यक्त होत असताना जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरूवारी सकाळी येथील बाजार समितीसमोर शेकडो शिवसैनिक गोळा झाले. दानवे व भाजपच्या विरोधात घोषणा देत दानवेंच्या प्रतिकात्मक पूतळ्याला जोडे मारून रोष व्यक्त केला. हे आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख माणिक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, रिसोड येथेही शिवसेनेने जोडे मारो आंदोलन करून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

Web Title: shiv sena agitation against Raosaheb Danve in Washim