नोटाबंदीविरोधात विरोधकांची घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - नोटाबंदीच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधान परिषदेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला व विधानभवन परिसरात मोर्चा काढला. विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले व त्यांचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा दिल्या. विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गट नेते शरद रणपिसे, भाई जगताप, सतेज पाटील, कृष्णबानो खलिफे, अनंत गाडगीळ, हरीभाऊ राठोड आदी सदस्य सहभागी झाले होते.

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. एकीकडे वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यवधी रुपये सापडतात तर दुसरीकडे नोटाबंदीवर संसदेत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही. अनेकांचे भ्रष्टाचार उघड पडेल म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप विरोधकांनी पत्रकारांशी बोलताना केला. नोटाबंदीमुळे नाहक त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जावी तसेच त्यांना अनुदान मिळावे. उत्तर प्रदेशात बॅंकेच्या रांगेत मृत पावलेल्या लोकांना मदत करण्यात आली त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मदत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.