सिकलसेलचे पाच जिल्ह्यांत अभियान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नागपूर - न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर सरकार आरोग्यदायी कार्यक्रम राबविण्यासाठी जागे होते. सिकलसेल नियंत्रणासाठी न्यायालयाने अनेकवेळा सरकारला धारेवर धरले. 

राज्यपालांनी सरकारला सिकलसेलसंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु, सिकलसेल नियंत्रणात सरकार अपयशी ठरले. अखेर सिकलसेल नियंत्रण सोसायटी ऑफ इंडियाने विदर्भातील पाच जिल्ह्यांत अभियान हाती घेतले आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावतीसह नागपूर जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अमरावतीमधील इर्विन चौकातही युवा संघाच्या सहकार्याने नुकताच सिकलसेलग्रस्तांचा मेळावा घेण्यात आला. येथे सहभागी ५०० जोडप्यांना सिकलसेल आजाराची माहिती देण्यात आली. नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात सिकलसेलचे ५० रुग्ण आणि ३० परिचारिकांना सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्‍यातल्या कटगूल येथेही कार्यक्रम घेण्यात आला. कुरखेडा येथील श्रीराम विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शाळकरी मुलांनाही सिकलसेलबाबत जागृत करण्यात आले. सिकलसेलचे रुग्ण असलेल्यांना  वेदना होत असल्यास औषधोपचाराची माहिती देण्यात आली. सिकलसेल रुग्णांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजना, त्यांचा लाभ कसा मिळवायचा, अडचणी आणि समस्यांवर मात करण्यासंदर्भात माहिती देण्यात येते. प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेच्या सहकार्याने गोंदिया जिल्ह्यातील के. टी. रुग्णालयातही कार्यक्रम घेण्यात आल्याचे सिकलसेल सोसायटी ऑफ  इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविली जात आहे.

Web Title: sikalsale campaign in five district