विदर्भातील प्रकरणांच्या चौकशीसाठी "एसआयटी' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नागपूर - विदर्भातील बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. नागपूर व अमरावती विभागातील प्रकल्पांसाठी स्वतंत्र पथक राहणार असून, यात विदर्भातील एकूण 43 प्रकल्पांचा समावेश आहे. यासंदर्भातील शपथपत्र मुख्य सचिवांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. 

माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या कंपनीला कंत्राट मिळवून देण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीअंतर्गत तपासली जात आहे. मात्र, आता एसआयटी स्थापन झाल्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जाते. मुख्य सचिवांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, सिंचन गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेत झालेली अनियमितता, कंत्राट देताना झालेली अनियमितता आदींबाबत एसीबी चौकशी करीत आहे. दोन्ही विभागांतील एसआयटी या एसीबी अधीक्षकांच्या देखरेखीत काम करतील. सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप आणि जनहित याचिका जनमंच या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. 

किती प्रकल्पांची चौकशी? 
26 : अमरावती विभाग 
17 नागपूर विभाग 

Web Title: SIT for inquiry in Vidarbha cases