सव्वाशेंवर झोपडपट्ट्यांत पाणी शिरण्याचा धोका

राजेश प्रायकर
बुधवार, 30 मे 2018

नागपूर - शहरातील सव्वाशेवर झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी तयारीच्या नावावर केवळ बैठकांवर जोर असल्याचे दिसून येत आहे. पाणी रोखण्यासाठी नियोजन झाले नसल्याने लाखांवर नागरिकांना यंदाही पावसाच्या पाण्याचा मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे. 

मागील वर्षी काही तासांच्या पावसांत शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरले. दरवर्षी शहरात हेच चित्र आहे. मात्र, यातून महापालिका प्रशासनाने अद्यापही बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. या वर्षी पावसाळी तयारीसंबंधात महापौर नंदा जिचकार यांनी दोन बैठका घेतल्या तर मार्च महिन्यात तत्कालीन आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी एक बैठक घेतली. परंतु झोपडपट्ट्यांमध्ये पाणी का साचते? बहुमजली इमारतीच्या तळघरात कुठून पाणी शिरते? याकडे महापालिकेचे दरवर्षी दुर्लक्ष होत आहे. मुळात शहरातील सिवेज लाईन तुंबणे, ड्रेनेज लाईनच्या स्वच्छतेचा अभावाने जोरदार पावसात रस्त्यांवर पाणी येऊन ते घरात शिरते. याबाबतची जाणीव असून अद्यापही ड्रेनेज लाईन स्वच्छता, तुंबलेली सिवेज लाईनची दुरुस्तीला प्रारंभ झाला नाही.

सुभाष रोडवरून नवभारत गल्लीत गेल्या सहा महिन्यांपासून सिवेज लाईन चोक आहे. घर बांधकामाकरिता पिलरसाठी खड्डा खोदला तर संपूर्ण सिवेजचे पाणी त्यात गोळा होत आहे. पावसाळ्यातही अशीच स्थिती राहिल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरणार हे नक्कीच. 
- विनोद मलमवार, सुभाष रोड. 

Web Title: slum water danger rain flood