एसपी ठाकरांनी शाळकरी विद्यार्थीनीसोबत साधला आपुलकीचा संवाद  

chandrapur.
chandrapur.

गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा संवाद साधीत त्यांनी समस्या जाणून त्या सोडविण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. दस्तुरखुद जिल्हा पोलीसांसोबतच्या संवादाने चिमुकलेही भारावले.

सध्या सोशल मिडीयावरून फेक व्हिडीओव्दारे समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न काही कंटकांकडून केल्या जात आहे. समाजव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. चुकीचे संदेश खरेच आहेत हा भास झाल्याने निदंनीय घटना घडू शकतात. याला आवर घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हयाबाबत जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.काल या उपक्रमाअंतर्गत जिल्हा पोलीस अधिक्षक नियती ठाकर या स्वत गोंडपिपरी तालुक्यातील विठठलवाडयात आपल्या टिमसोबत दाखल झाल्या.गोंडपिपरीचे ठाणेदार प्रविण बोरकुटे, पिएसआय मुंडे, सरपंच नितीन काकडे, पोलीस पाटील पिंपळकर यांची उपस्थिती होती.

सुरवातीला नियती ठाकर यांनी जनजागृती वॅनमधील प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध विषय समजावून सांगितले. सोशल मिडीयाच्या गैरवाफराने विविध अनुचीत घटना घडत आहेत. यामुळे या माध्यमाचा वाफर करतांना कशी काळजी घ्यायची. हे सांगतांनाच समाजहितासाठी या माध्यमांचा वाफर नवा संदेश देणारा ठरेल असे त्या म्हणाल्या.सोशल मिडीयावरून येणारे विविध संदेशाची आपण सजगपणे खात्री करावी, सदविवेकबुध्दीला चालणा देउनच निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यांनतर ठाकर यांनी उपस्थित महिला, किशोरवयीन व शाळेतील विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांच्या विविध समस्या आपुलकीने जाणून घेतल्या. यातून त्यांना मोठया प्रमाणावर आरोग्य यंत्रणेच्या समस्या असल्याचे प्रकर्षाने समोर आले. या समस्या पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यापर्यत मांडून त्या तातडीने निकाली काढण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांनी दिली. तब्बल तासभर एसपी नियती ठाकर या विठठलवाडयात होत्या. दस्तुरखुद एसपी मॅडमची थेट संवाद साधून त्यांच्यापुढे समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने विशेषकरून शाळकरी मुली अक्षरश भारावल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com