चिमण्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र 

चिमण्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र 

चंद्रपूर - निसर्गातील जैवविविधता तसेच अन्नसाखळी शाबूत राहण्याच्या दृष्टीने चिमण्यांची पर्याप्त संख्या टिकवून ठेवणे गरजेचे आहे. चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृत्रिमरीत्या प्रजनन करण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सेमिनरी हिल्स नागपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, रामबाग वनवसाहत चंद्रपूर, वनवसाहत औरंगाबाद या ठिकाणांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे.

या ठिकाणी चिमण्यांच्या आढळाबाबत सर्वेक्षण करणे, कृत्रिम घरटी बसविणे, कोनाडे तसेच वळचणी उपलब्ध करणे, बीएनएचएस किंवा इतर तज्ज्ञ यंत्रणांशी सल्लामसलत करून चिमण्यांना अन्न उपलब्ध करणे, घरट्यांसाठी जागा मिळावी, या दृष्टीने मडबाथ, जैविक कुंपण तसेच गवत उपलब्ध करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत. उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्याच्या दृष्टीने नियमितपणे चिमण्यांच्या संख्येवर संनियंत्रण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करणे तसेच कृत्रिम घरटी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरसुद्धा भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील उपक्रमांमुळे जर चिमण्यांच्या संवर्धनात अनुकूल परिणाम प्राप्त झाला, तर या उपक्रमाची इतरत्र पुनरावृत्ती करण्यात येईल. जर अपेक्षित परिणाम प्राप्त झाला नाही तर कृत्रिम प्रजननाचा अवलंब करावा लागेल. ज्यामध्ये प्रजनन, पिंजरेअंडी उबवणे आदी उपक्रमांचा समावेश असेल. यासाठी केंद्रीय प्राणी प्राधिकरण तसेच राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची मान्यता घेण्यात येईल, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com