आशना, मिहिका शहरातून प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालामधेही मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या. शहरातून सेंटर पॉइंटच्या दाभा शाखेतील आशना चोपडा आणि नारायणा शाळेतील मिहिका ढोक यांनी संयुक्तपणे ९८.६ टक्‍क्‍यांसह प्रथम स्थान पटकाविले. 

सीबीएसईतर्फे ५ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान देशभरात दहावीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये शहरातील ३० शाळांमधून जवळपास पाच ते सहा हजारांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसरे स्थान ९८.४ टक्‍क्‍यांसह सेंट झेव्हिअरच्या प्रेरणा अग्रवाल हिने मिळविले. तिसऱ्या स्थानासाठी शहरातील शाळांमध्ये बरीच चुरस असल्याचे दिसून आले. सेंटर पॉइंटच्या काटोल रोड शाखेतील अर्णव भौमिक, दिशिता सिब्बल, भवन्सच्या आष्टी शाखेतील यश काळे, रायल गोंडवानातील सेजल वैरागडे तर सेंट विन्सेंट पलोटी शाळेतील प्रिया सुतार यांनी ९८.२ टक्‍के गुण मिळवीत संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळविले. 

मुलांना पछाडले
देशभरात निकालात साडेतीन टक्‍क्‍यांनी घट आली. मात्र, गतवर्षीच्या मुलांच्या तुलनेत मुलींनी निकालात चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गतवर्षी मुलांनी ०.९ टक्‍क्‍याने चांगली कामगिरी केली होती. मात्र, यंदा मुलींनी ३.२५ टक्के अधिक उत्तीर्ण होत मुलांना पछाडले आहे. मुलींची टक्केवारी ८८.६७ तर मुलांची ८५.३२ टक्के आहे. 

Web Title: SSC-CBSE-Result