नागपूर विभागात पावणेदोन लाखांवर विद्यार्थी

नागपूर विभागात पावणेदोन लाखांवर विद्यार्थी

दहावीची परीक्षा आजपासून - जिल्ह्यात 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी
नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, विभागात 682 केंद्रांवर एक लाख 87 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात परीक्षार्थींमध्ये 99 हजार 288 मुले तर 88 हजार 549 मुलींची संख्या आहे. सकाळी अकरा ते दोन वाजतादरम्यान दहावीचा मराठीचा पेपर घेण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी दहावी ही पहिलीच बोर्डाची परीक्षा असल्यामुळे काहीसे दडपण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचीही परीक्षा असते. अनेक विद्यार्थी हे यासाठी बोर्डाने समुपदेशन केंद्रांची सोय केली आहे. येथे फोन करून विद्यार्थी आपले समाधान करू शकतात, असे बोर्डाने कळविले आहे. बोर्डाच्या वतीने उपद्रवी आणि संवेदनशील असणाऱ्या दहावी परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी "सीसीटीव्ही कॅमेरा'ची नजर राहणार आहे.

बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आल्यानंतर उद्या मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना नक्कल करण्यासाठी मदत होईल, असे कृत्य टाळण्यासाठी परीक्षा मंडळाने तयारी केली असून, प्रत्येक जिल्हास्तरावर भरारी पथक नेमले आहेत. यंदा दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. एक एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे.

बोर्डाचा सल्ला
- परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र स्वत: पाहून खात्री करावी.
- रात्री झोपण्यापूर्वीच परीक्षेसाठी आवश्‍यक असलेले साहित्य तयार ठेवावे.
- रिसीटची झेरॉक्‍स काढून ठेवावी.
- परीक्षेला जाण्यापूर्वी हलका आहार घ्यावा.
- परीक्षेला वेळेच्या आत 30 मिनिटे पोहोचण्यासाठी शक्‍य तितके लवकर निघावे.
- परीक्षेला जाताना सोबत प्रवेशपत्र, ओळखपत्र व इतर आवश्‍यक साहित्य घ्यावे.
- परीक्षा दालनात प्रसन्न व आत्मविश्‍वासाने जावे.
- नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे अगोदर मिळालेल्या उत्तर पत्रिकेवर आवश्‍यक ती माहिती योग्य ठिकाणी भरावी.
- नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे अगोदर मिळालेल्या प्रश्‍नपत्रिकेचे फक्त वाचनच करावे.

हेल्पलाइनची सोय
परीक्षेला जाताना वा त्यापूर्वी परीक्षेचे टेन्शन वा त्याबद्दल कुठलीही समस्या उद्‌भवल्यास विद्यार्थी वा पालकांनी बोर्डाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहे. असे आहेत क्रमांक - 9922453235, 9850246389, 9763667416, 9422053391, 9890144185.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com