अकोला जिल्ह्यात चार विद्यार्थी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

अकोला - जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली. वेळापत्रकानुसार पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा म्हणजेच मराठी, उर्दू व हिंदी विषयाचा पेपर दिला. परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या पेपर दरम्यान पिंजर व मूर्तिजापूरच्या केंद्रांवर एकूण चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना निलंबित करण्यात आले. पिंजरच्या केंद्रावर विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी व मूर्तिजापूरच्या केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली.

विद्यार्थी अनुपस्थित
मंगळवारी घेण्यात आलेल्या मराठी विषयाची परीक्षा 18 हजार 703 विद्यार्थी पेपर देणार होते; परंतु 18 हजार 492 विद्यार्थ्यांनीच पेपर दिला. 211 विद्यार्थी अनुपस्थित होते. उर्दू विषयाच्या परीक्षेला चार हजार 615 विद्यार्थी बसणार होते; परंतु चार हजार 537 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली व 78 विद्यार्थी अनुपस्थित होते. हिंदी विषयाची परीक्षा 404 विद्यार्थी परीक्षा देणार होते; परंतु 398 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. सहा विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस अनुपस्थित होते.

Web Title: ssc student suspend in akola district