विद्यार्थी करताहेत बारा तास अभ्यास - प्रा. डॉ. बागडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नागपूर - विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जातात. नवनवीन कोर्सच्या माध्यमातून मुलांचा विकास व्हावा, यासाठी शिक्षक व पालक प्रयत्नशील राहतात. या पार्श्‍वभूमीवर कामठी मार्गावरील डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी निरंतर बारा तास अभ्यास करताहेत. डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारपर्यंत (ता. ५) हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी साडेसहा वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. तीनदिवसीय उपक्रमात विद्यार्थी रोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत बारा तास निरंतर अभ्यास करतील. सुरुवातीला विपश्‍यना आचार्य कल्पना सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर वर्षभर नियमित निरंतर बारा तास वाचनाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बागडे यांनी सांगितले. प्रा. डॉ. शुभा मिश्रा, प्रा. डॉ. मिथिलेश अवस्थी, प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे, प्रा. डॉ. जयंत जांभूळकर, प्रा. डॉ. मनीषा नागपुरे, प्रा. डॉ. विवेक चव्हाण, प्रा. डॉ. सुरेश भागवत, प्रा. डॉ. सुमेध नागदेवे, प्रा. कमलाकर तागडे, प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रा. डॉ. महेंद्र गायकवाड व प्रा. प्रणोती सहारे उपस्थित होते.

या महाविद्यालयात येणारी बहुतांश मुले गरीब घरची असतात. शिक्षणासोबतच त्यांना नोकरी करणे गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने ते दिशाहीन होतात. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागेल. भविष्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होईल.
- प्रा. डॉ. नरेंद्र बागडे