विद्यार्थिनीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नागपूर - एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शीतल दीनानाथ रमभाळ (३०, अनमोलनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर एमबीए करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती तयारीसुद्धा करीत होती. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शीतलने लहान बहिणीला अभ्यास करण्यासाठी खोलीत जात असल्याचे सांगितले. दरम्यान, तिने दरवाजाच्या मागील कपडे लटकविण्याच्या हॅंगरला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अर्ध्या तासाने लहान बहीणसुद्धा झोपण्यासाठी खोलीकडे गेली. तिने शीतलला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. तिला काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. तिने लगेच आईला आवाज दिला. खिडकीतून पाहिले असता शीतल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. दीनानाथ नामदेव रमभाळ (५८) यांनी दिलेल्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शीतल स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. मात्र, नोकरी लागत नसल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला.

Web Title: Student Suicide in nagpur