साखर @ 42 रुपये 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - वायदे बाजारामध्ये सटोडियांची सक्रियता पुन्हा वाढल्याने साखरेच्या भावात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे साखर चाळिशी गाठण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. पंधरा दिवसांपूर्वी साखरेचे दर प्रति किलो 39 रुपये होते. ते आता 42 रुपयांवर पोहोचले आहेत. 

नागपूर - वायदे बाजारामध्ये सटोडियांची सक्रियता पुन्हा वाढल्याने साखरेच्या भावात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे साखर चाळिशी गाठण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. पंधरा दिवसांपूर्वी साखरेचे दर प्रति किलो 39 रुपये होते. ते आता 42 रुपयांवर पोहोचले आहेत. 

गेली महिनाभर साखर बाजारपेठेतील उलाढाल साधारणच होती. मात्र, यंदा साखरेची निविदा अधिक दरात उघडली आहे. उत्पादन घटल्याने यंदा सटोडियांनी पुन्हा एकदा वायदे बाजारावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कारखान्यांकडील साखरेच्या निविदा क्विंटलला सरासरी 300 रुपयांनी वधारल्या. वायदे बाजारात साखरेचे आगामी सौदे उंच भावात गेले आहेत. मात्र, आता साखरेच्या भावात वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

याबाबत घाऊक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्या साखरेला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात अजून साखरेची मागणी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता भाव वाढण्याचे संकेत आहेत. मात्र, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांतील साखरेच्या निविदा उंच भावात जाण्यामुळे भाववाढीस चालना मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत साखरेचे भाव बाजारपेठेत क्विंटलला 320 रुपयांनी पुन्हा वाढले आहेत. तीन जानेवारी रोजी प्रति क्विंटलचा भाव 3750 ते 3800 रुपयांवर पोहोचले होते. ते आज 3900 रुपयांवर गेले आहे. कारखान्यांकडून कमी भावात साखर विक्री करायची नाही, असेच धोरण असल्याचे बोलले जात आहे. सोबतच सटोडियेही सक्रिय झाले असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. 

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017