युवकाच्या शेपटावर शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

सुपर स्पेशालिटीत काढले १८ सेंमीचे शेपूट

नागपूर - शेपूटधारी हनुमानाची कथा बहुतेकांना माहीत आहे. शेपूटधारी तरुणाची गोष्ट कुणी सांगितल्यास त्याला खोटे ठरविण्यात येईल. परंतु, १८ वर्षीय तरुण जन्मापासूनच शेपूट घेऊन लहानाचा मोठा झाला. सोमवारी ११ च्या सुमारास सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तरुणाला असलेले १८ सेंटिमीटर लांबीचे शेपूट शरीरावेगळे करण्यात आले. 

वाढत्या वयासोबत शेपूटही वाढत गेले. वाढलेले शेपूट अडचणीचे ठरले होते. यामुळे तो आठवडाभरापूर्वी नातेवाइकांसह सुपर स्पेशालिटीत पोहोचला. डॉक्‍टरांनी त्याला २ ऑक्‍टोबरला परत बोलावून घेतले. तत्पूर्वी, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याने आठवडाभर औषधोपचार घेतला. रविवारीच तो रुग्णालयात आला. डॉक्‍टरांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी दाखल करून घेतले. सोमवारी आवश्‍यक त्या तपासण्या करून घेण्यात आल्या. 
११ च्या सुमारास सुपरचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया झाली. डॉ. श्रीमती वली व डॉ. गाणार यांनी युवकाला भूल दिली. न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व डॉ. दिवीक मित्तल यांनी तासाभराची यशस्वी शस्त्रक्रिया केली. कंबरेच्या मागच्या भागातील शेपूट शरीरावेगळे केले. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती ठीक आहे. त्याला पाच दिवसांनंतर सुटी दिली जाणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळते.

टॅग्स

विदर्भ

नागपूर - दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर "पॉलिटेक्‍निक' प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लांबली...

12.30 AM

नागपूर - जवळपास दीड महिन्याच्या सुटीनंतर विदर्भातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. नवीन वह्या-पुस्तके, नवे दप्तर यांसह...

12.15 AM

नागपूर - दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात...

सोमवार, 26 जून 2017