शिक्षकांच्या प्रचाराची वारी संपली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नागपूर - शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या शिक्षक संघटना आणि विविध पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराची वारी बुधवारी सायंकाळी संपली. शुक्रवारी मतदान होणार असल्याने उद्याचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी छुप्या बैठकांवर भर राहणार आहे. 

शिक्षक मतदारसंघासाठी जानेवारी महिन्यांपासूनच प्रचारास सुरुवात झाली. यंदा काँग्रेसकडून अनिल शिंदे, तर शिवसेनेकडून प्रकाश जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने निवडणुकीत बरीच चुरस निर्माण झाली.

भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागोराव गाणार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिक्षक संघटना विरुद्ध पक्षीय उमेदवार असे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या परिषदेतही बंडखोरी झाली असून, शेषराव बिजवार आणि संजय बोंदरे यांनी उमेदवारी घोषित केल्याने परिषदेला फटका बसण्याची शक्‍यता अधिक आहे. 

दुसरीकडे शिक्षक भारतीचे प्रा. राजेंद्र झाडे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडूनही आनंदराव कारेमारे या उमेदवारांनी आपला दम लावला आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार खेमराज कोंडे यांनीही बराच घाम गाळला आहे. त्यामुळे निवडणूक चुरसपूर्ण होणार आहे. आता मतदानासाठी ३४ हजार शिक्षक मतदार असून, तीन फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात मतदारांचा कौल कुणाकडे राहील याकडे सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

रिंगणातील उमेदवार
अनिल दिनकरराव शिंदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गाणार नागोराव पुंडलिक (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, भाजपसमर्थन), प्रकाश भगवंतराव जाधव (शिवसेना), डोंगरदेव अरुण ऊर्फ रवींद्रदादा महादेवराव (बळीराजा पार्टी), झाडे राजेंद्र बाबूराव (लोकभारती), आनंदराव व्यंकय्याजी अंगलवार (अपक्ष), कारेमोरे आनंदराव गोविंदराव (अपक्ष), खेमराज परसराम कोंडे (अपक्ष), गजभिये प्रेम हरिदास (अपक्ष), चंद्रकांत गोहणे पाटील (अपक्ष), पठाण अजहर शफीउल्ला (अपक्ष), बल्लमवार विलास शंकरराव (अपक्ष), बिजवार शेषराव नारायण (अपक्ष), बोंदरे संजय चिंतामण (अपक्ष), लांजेवार अशोक वासुदेवराव (अपक्ष), हर्षबोधी अरुण निळकंठ (अपक्ष).