शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

यवतमाळ - येथील यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस)मधील चिमुकल्या विद्यार्थिनींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आज, मंगळवारी स्थानिक श्रीसाई विद्यानिकेतन संस्थेतील चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील संशयित शिक्षकाला पोलिसांनी वेळीच अटक केल्याने पुढील अनर्थ टळला. 

गजानन भलावी (वय 27, रा. सत्तरपूर, ता. आष्टी, जि. वर्धा) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. तो वर्गातील विद्यार्थिनीशी काही वर्षांपासून चाळे करीत असल्याचा प्रकार पीडित मुलीच्या पालकांच्या आज निदर्शनास आला. त्यांनी यवतमाळ शहर पोलिसात सोमवारी (ता. 16) रात्री तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संशयित शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद करून तातडीने वर्धा जिल्ह्यातील सत्तरपूर गावातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नंदकिशोर पंत करीत आहेत.

विदर्भ

नागपूर - माथाडी कामगारांचे वेतन चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन आठवड्यांमध्ये नव्याने निश्‍चित करा, असा आदेश बुधवारी...

02.00 PM

नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची...

01.57 PM

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

09.21 AM