जुन्या पेन्शनसाठी अन्नत्याग आंदोलन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

अमरावती- भारतीय राज्य घटनेमध्ये पेन्शन योजना नमूद केलेली असताना शासन डीसीपीएस योजना लागू करून शिक्षकांच्या हक्कांची गळचेपी करीत आहे. शिक्षक तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शिक्षक महासंघ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांत अन्नत्याग आंदोलन पुकारणार आहे.

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 11 डिसेंबर 2015 ला डीसीपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे डीसीपीएस लागू करणे सुसंगत तसेच न्याय नाही. जुनी पेन्शन योजना मिळणे हा शिक्षकांचा न्याय हक्क असून, भविष्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली ती एक तरतूद आहे.

सेवानिवृत्तीनंतर जीवन जगण्याचा आधार म्हणजे जुनी पेन्शन योजना होय. परंतु शासन शिक्षकांच्या या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्यानेच 15 एप्रिलपासून पाचही जिल्ह्यांत उपोषण करण्यात येणार असल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी सांगितले.