शाळांमधील तृतीय, चतुर्थ कर्मचारी भरतीसंबंधी पाठपुरावा करणार

arvi
arvi

आर्वी (वर्धा) : विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शाळात चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. याबाबत मागेच शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक शाळेच्या लिपिक आणि शिपाई यांचे कमतरतेमुळे शाळेत समस्या निर्माण झाल्या आहे. या शाळेच्या अडचणी मी समजू शकतो. यासंदर्भात मी स्वतः शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिक्षण संचालक पुणे गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

वर्धा जिल्हा दौरा आणि शाळांच्या अडचणी संदर्भातील भेटीप्रसंगी ते आले असता जिप. वर्धा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात त्यांनी विदर्भ मुख्याध्यापक संघ आणि वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. त्याप्रसंगी मुख्याध्यापक पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करताना शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे बोलत होते.

याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पारधी उपशिक्षाणाधिकारी मेश्राम वेतन पथक निरीक्षक साखरकर अधीक्षक शिरभाते विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव व जिल्हाध्यक्ष सतिश जगताप, सचिव मनोहर बारस्कर, संघटक मिलिंद मुळे, अनिल बाळसराफ, प्रदीप गोमासे शालिनी वाळके विदर्भ प्रसिद्धी प्रमुख राजेश सोळंकी प्रसाद चंदावार संजय नांदे मिलिंद सालोडकर रामेश्वर लांडे कविता जोशि विदर्भ व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन संच मान्यतेत काही शाळांची पटसंख्या झीरो आल्या आहे मात्र ते भरताना शाळानि चुक केली असेल ? किंवा आमच्या मार्फत टेक्निकल अडचण निर्माण झाली असेल ? तर ते २१ दिवसात दुरुस्त करुन दिल्याची कार्यवाही केली जाईल. अनेक शाळेत विषयवार शिक्षक नसल्याची  अडचण लक्षात घेऊन मुख्याध्यापकाच्या मागणीप्रमाणे विषयवार शिक्षक दिल्या जाईल. जे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचे समायोजन केल्या जाईलच ही कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षक घेतले नाही. त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे वेतन थांबविण्याचे निर्देश शिक्षण संचालकानी शिक्षण अधिकारी यांना दिले.

अनेक मराठी शाळेत विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे मात्र ९० च्या कमी शाळेतील विद्यार्थी संख्या झाली तरी मुख्यध्यापकास बाधा पोहचणार नाही. शासन निर्णयप्रमाणे ते मुख्याध्यापक सेवानिवृत्त होइपर्यंत त्यांना वेतन निश्चिती व पद  संरक्षण दिले आहे. त्यानंतर ते पद व्यापगत केले जाणार असल्याचे त्यांनी मुख्याध्यापक व पदाधिकारी यांना निक्षून सांगून आश्वस्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com