केळीच्या बागेत वाघ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

हिंगणा - तालुक्‍यातील सावंगी (देवळी) शिवारातील केळीच्या बागेत मजुरांना वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वाघाने रानडुकराची शिकार केल्यावर ताव मारण्यासाठी थंड जागेच्या शोधात केळीच्या बागेत शिरला असावा, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा वाघ केळीच्या बागेतच ठाण मांडून होता. 

सावंगी (देवळी) ते बिटबोरगाव मार्गावर पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेजवळून शेतमजूर ज्ञानेश्‍वर उके व अन्य दोघे सकाळी १० वाजताच्या दरम्यान जात असताना त्यांना वाघ दिसला. त्यांनी आरडाओरड करीत ही माहिती ग्रामस्थांना दिली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची गदी उसळली. माहिती वनविभाग व पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. लोकांची आरडाओरड शांत करून वाघाने गावाकडे प्रवेश करू नये यासाठी गावाकडे जाणारा शेताच्या भागावर जाळी लावण्यात आली आहे. सकाळी चार वाजताच्या सुमारास वाघाने शेतात प्रवेश केला असावा असे नागरिकांचे मत आहे. एक चार चाकी वाहनाच्या आवाजाने वाघ बाहेर आला. यानंतर पुन्हा एकदा वाघ बागेतून बाहेर आला. वाघ जंगलात परत जावा यासाठी वनविभागाच्या कार्मचाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजता बॅंन्ड वाजवून व फटाके उडवून त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. 

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे
विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वी हिंगणा परिसरातील एका वसाहतीत बिबट शिरला होता. आता वाघ जंगल सोडून शेतशिवारात आला आहे. उन्हाळा सुरू असल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावांकडे कुच करीत असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Tigers in banana garden

टॅग्स