तीळ उत्पादनात वाढ, गोडवा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नागपूर - ‘तिळगूळ घ्या, गोडगोड बोला’ असे म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा देणे यंदा  स्वस्त झाले आहे. तिळाच्या किमतीत स्वस्ताईचा गोडवा राहणार आहे. 

यंदा तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. तर, दुसरीकडे नाणेबंदीमुळे मागणी कमी  झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत तिळाच्या भावात १० टक्‍क्‍यांची घसरण झाली. गुळाचे भावही नियंत्रणात आहेत. 

तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व असलेला मकरसंक्रांतीचा सण १० दिवसांवर आहे. गुजरात, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील काही भागातून नागपूर बाजारपेठेत तिळाची आवक सुरू झाली आहे. यंदा आवक वाढल्याने भाव घसरले. पांढरे तीळ ११५ ते १२५ रुपये किलोप्रमाणे तर गुजरात येथून येणाऱ्या तिळाला ११० ते १२० रुपयांचा भाव मिळत आहे. अद्याप ग्राहकांनी तिळाची खरेदी सुरू केली नसून, पुढील आठवड्यात मागणी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या लाल तीळ १४० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. यंदा ग्राहकांचा कल सारटेक्‍स तिळाकडे आहे. बाजारात हे तीळ १२० रुपये किलोप्रमाणे विकले जाताहेत. आंध्र प्रदेशातून  येणारे तीळ ९५ रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहेत. तिळासोबतच गूळदेखील स्वस्त झाला  असून, भाव नियंत्रणात आहेत, असे किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्‍वर रक्षक  म्हणाले.

गुळाच्या दरात वाढ
बाजारपेठेत लाडू, गूळ २६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. गुळाच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे गुळाला प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये मोजावे लागणार आहेत, असे किराणा व्यापारी अनिल नागपाल यांनी सांगितले.

Web Title: til production increase