शहराच्या प्रश्‍नांबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

nagpur
nagpur

नागपूर : राज्य सरकारकडील महापालिकेच्या हद्दीतील प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्थानिक आमदारांची गुरुवारी (ता. 19) बैठक असून, राज्य व केंद्र सरकारशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ऍड. गौतम चाबुकस्वार हे आमदार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य सरकारचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. याबाबत जगताप म्हणाले, "पुनावळे येथील नियोजित सांडपाणी प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्यामुळे पशुसंवर्धन विभागाची थेरगावची जागा मिळावी, अशी मागणी आहे. प्राधिकरणाने घेतलेल्या जागेचा साडेबारा टक्के मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. लष्कर भागातील रस्त्यांची जागा महापालिकेला मिळावी. या मुद्द्यांवर चर्चा होईल.

महापालिकेत नवीन गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.'' लांडगे म्हणाले, "स्मार्ट सिटीची विकासकामे, पुणे-नाशिक रस्त्याचे विस्तारीकरण व मेट्रोचा नियोजित प्रकल्प यांचा आराखडा तयार करणे, बंद झालेल्या एसआरए योजना पुन्हा सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासआराखड्या विषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.'' शहराच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकल्प असून, त्याबाबत चालना मिळाल्यास शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com