अकोटमध्ये ट्रॅक्टरच्या 'फॅशन शो'ने केली धमाल; मॉडेल्स् ऐवजी रॅम्पवर चालले ट्रॅक्टर 

Tracktor fashion show in akot
Tracktor fashion show in akot

अकोट - सर्व सामान्यपणे सौंदर्यवतीच्या स्पर्धा विविध क्लबद्वारे घेण्यात येतात. पण आपल्या अगळ्यावेगळ्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट जेसीआयने ट्रॅक्टर सजवाट स्पर्धा आयोजित करून कल्पतेचा नवा आयाम गाठला. 

होरीझोन या नावाने अकोट जेसीआयतर्फे त्यांच्या वार्षिक सप्ताह सुरू आहे. या सत्ताहात दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात. या उपक्रमा अंतर्गत स्थानिक बिलबिले मंगल कार्यालयाच्या प्रांगणात ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा 'ट्रॅक्टर फॅशन शो' नावाने घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सामान्यपणे फॅशन शोमध्ये तरुणी किंवा महिला रॅम्पवर चालत आपल्या सौंदर्याचा व बुद्धिमत्तेचा प्रदर्शन करतात. मात्र या ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये विविध भागातील शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आकर्षक पणे सजवून ते नियोजित मार्गावर चालून एका प्रकारे ट्रॅक्टरचे रॅम्पवॉक सादर केले. या ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये इतर सजावटी सोबतच जागृतीचा संदेश देता येईल असे घोषवाक्य त्यावर लावण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. हौशी ट्रॅक्टर मालकांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्पर्धेमध्ये रंगत आणली. ज्याप्रमाणे सौंदर्य स्पर्धेतील तरुणी रॅम्प वॉक करतात अगदी त्याच प्रमाणे ट्रॅक्टरचे समोर जाणे आणि रिवर्स गेअर घेऊन मागे येणे हे सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. 

ट्रॅक्टर व अनेक सामाजिक संदेश देण्यात आले होते. स्पर्धात प्रारंभ करतावेळी व्यासपीठावर जेसीआयचे किशोर लहाने, अतुल भिरडे, अमर राठी, प्रशांत खोडके, बीपीन टावरी, दिलीप हरणे, गजानन शिंगानारे, अशोक डोंगरे, नंदकिशोर शेगोकार, मिलिंद झाडे, गणेश गहले, ठाणेदार गजानन शेळके, नगरसेवक गजानन लोणकर उपस्थित होते. 

तरुणीचाही सहभाग -
सर्व क्षेत्रात तरुणींनी तरुणांच्या बरोबरीने आपली योग्यता सिद्ध केली आहे. ट्रॅक्टर फॅशन शोमध्ये चंचल पितांबरवाले स्वतःहून ट्रॅक्टर चालवून तरुणीही समर्थपणे शेती करू शकतात हे दाखवून दिले. 

यांनी पटकावला क्रमांक -
ट्रॅक्टर सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस विजय बोरोडे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्रणव टवले व तृतीय क्रमांकाचे बक्षीस ऋषिकेश नाठे तर उत्तेजनार्थ युवराज मिश्रा, सुरेश इचे, अक्षय शेगोकार, अरविंद दिंडोकार, सुरेश शेडोकार, चंचल पितांबरवाले यांना देण्यात आले. 

आपली अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक साधनाऐवजी यांत्रिक साधने वापरत आहे. बैलाची जागा ट्रॅक्टर घेतली आहे. यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा जिवा भावाचा सोबती आहे. हे लक्षात घेता आम्ही ट्रॅक्टर सजावट स्पर्धा घेतली. 
- अमर राठी, सप्ताह प्रमुख जेसीआय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com