ट्रॅक्टर कालव्यात उलटून दोघे ठार

तुमसर तालुक्यातील आसोलापाणी येथील घटना
crime news
crime newsSakal

भंडारा - शेतात कामावर जात असलेला ट्रॅक्टर रस्त्यालगत असलेल्या कालव्यात उलटून त्याला आग लागली. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांची नावे दिनेश गौपाले (वय ३०) आणि अर्जुन रहांगडाले (वय ३२, रा. भोंडकी) अशी आहेत.

सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. तुमसर तालुक्यातील आसोलापाणी येथील दिनेश गौपाले यांच्या शेतात मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर बोलावण्यात आला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास चालकासह दिनेश ट्रॅक्टरने शेतात जात होते. कारली जलाशयाच्या कालव्याच्या पाळीने जात असताना चालकाचे संतुलन बिघडून ट्रॅक्टर कालव्यात उलटला. यात चालक अर्जुन रहांगडाले व दिनेश गौपाले ट्रॅक्टरखाली दबले.

ट्रॅक्टर उलटल्यानंतर त्याला आग लागल्याने उपस्थितांना दोघांच्या बचावासाठी कोणतेही प्रयत्न करता आले नाही. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोबरवाही पोलिसांनी या घटनेची नोंद करून बरेच परिश्रम करून ट्रॅक्टरच्या इंजिनखालून दोन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविले. सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना सोपविण्यात आले. गोबरवाही पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com