शेण अन्‌ गांडूळ खताचा "केक'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

 अमरावती : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवडीची मोहीम सर्वत्र जोमात हाती घेण्यात आली असली, तरी वृक्षांच्या संवर्धनाचा महत्त्वाचा मुद्दाही तेवढ्याच ताकदीने हाती घेण्याचा अभिनव प्रयोग अमरावतीत झाला. स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांचा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी शेणखत व गांडूळखताचा मोठा केक तयार करण्यात आला. हा केक कापून तो सर्वच रोपांना देण्यात आला.

मागील वर्षी राबविण्यात आलेल्या 4 कोटी वृक्षलागवड मोहिमेत येथील 25 हेक्‍टर जागेवर 27 हजार 500 रोपांची लागवड करण्यात आली होती. वर्षभरापासून या रोपांची योग्य पद्धतीने देखभाल करण्याची जबाबदारी वनसंरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनी सक्षमपणे पेलली. आज या रोपट्यांचा पहिला वाढदिवस असल्याने तो साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला; अन्‌ वर्षभरापासून गोळा केलेले शेणखत तसेच गांडूळखताचा केक तयार करण्यात आला. त्यावर युरियाने "पहिला वाढदिवस' लिहिण्यात आले. केकच्या बाजूला फुगे लावून एखाद्या व्यक्तीचाच वाढदिवस असल्याचे वातावरण तयार करण्यात आले. मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवन संरक्षक हेमंत मीना, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, श्री. मसराम, अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा केक कापण्यात आला व प्रत्येक झाडाला त्याचे खत देण्यात आले.
वन बहरणार
वडाळीच्या बांबू गार्डनच्या मागील भागात 27 हजार झाडांचे हे वन आता बहरत आहे. वड, पिंपळ, कडुनिंब, सागवान, आंबा, चिंच, फणस अशा विविध प्रजाती या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

Web Title: tree birthday celebration news