आता कुपोषित बालकांची होणार क्षयरोग तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - तीव्र कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे लवकर निदान व्हावे, यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील कुपोषित बालकांच्या क्षयरोगाचीही तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य मंडळांना देण्यात आल्या आहेत. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार देशात नऊ लाख बालके तीव्र कुपोषित आहेत. 

कुपोषणामुळे बालकाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. अशी बालके क्षयरोग्यांच्या संपर्कात आल्यास त्यांना क्षयरोग होण्याचा धोका वाढतो. बालकांच्या मृत्यूच्या कारणांतील एक महत्त्वाचे कारण क्षयरोगाची लागण हे आहे. 

पोषण पुनर्वसन केंद्र 
भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापित करण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येतात. तसेच, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम पथक गावोगावी अंगणवाडी व शाळांत तपासणी करतात. 

बालकांना पोषण आहार सल्ला व उपचार देतात. 
 
आरोग्यसेवा मंडळाला प्राप्त सूचना 

  • बालस्वास्थ्य पथकांनी भेटीमध्ये कुपोषित बालकांची क्षयरोगतपासणी करावी. 
  • क्षयरोगाची शक्‍यता असल्यास तपासणीसाठी उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात पाठवावे. 
  • बालकांच्या तपासणीसाठी सीबीएनएएटी, थुंकी तपासणी किंवा कल्चर तपासणी करावी. ही तपासणी उपलब्ध नसल्यास छातीचा एक्‍सरे आणि मनटोन्युस्क पद्धतीने काढावा. ट्यूबरक्‍युलीन स्क्रीन टेस्ट करावी. क्षयरोगाचे निदान झालेल्या कुपोषित बालकांच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी आवश्‍यक औषधीसाठा जतन करावा. स्थानिक पातळीवर क्षयरोग औषधी खरेदी व पुरवठ्याची जबाबदारी संबंधित जिल्हा क्षयरोग अधिकारी यांची राहील.

यांचे होणार निदान  
बालकाचे वय पाच वर्षांहून कमी 
कुटुंबात क्षयरोगी असल्यास एचआयव्ही बाधित बालक
तीव्र कुपोषित बालक

Web Title: Tuberculosis testing will be malnourished children