साडेपाचशे किलो गॅसने तोडल्या बाराशे टन सळाखी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नागपूर - छत्रपतीनगर चौकातील उड्डाणपूल तोडण्याचे काम संपुष्टात आले आहे. आतापर्यंत 13 हजार क्‍युबिक मीटर मलबा निघाला असून, सळाखी वेगळ्या करण्यात येत आहे. आतापर्यंत निघालेल्या बाराशे टन सळाखी तोडण्यासाठी साडेपाचशे किलो गॅसचा वापर करण्यात आल्याचे समजते. 

उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रॅम्प, स्लॅब तसेच दोन पिलरही तोडण्यात आले. स्लॅबचा मलबा पूर्णपणे हटविण्यात आला आहे. आता रॅम्पमधील गिट्टी व माती उपसण्याचे काम सुरू आहे. रॅम्प तोडल्यानंतर लगेच कॉम्बिक्रशरच्याच सहाय्याने त्याचे लहान-लहान तुकडे करण्यात येत आहे. त्यातून सळाखी वेगळ्या करून चौकातून बाहेर हलविण्यात येत आहे. बाराशे टन सळाखी गॅसकटरने तोडल्या असून, 40 गॅस सिलिंडरचा वापर करण्यात आला.

आतापर्यंत उड्डाणपूल तोडण्याचे 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. 
एका क्‍युबिक मीटरमध्ये जवळपास सव्वाशे किलो सळाखी निघत आहे. 13 हजार क्‍युबिक मीटरमध्ये जवळपास बाराशे टन सळाखी निघाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाहून नेण्यासाठी सोपे व्हावे यासाठी सळाखी तोडण्यात येत आहे. यासाठी जवळपास पन्नास कुशल कामगारांचे पथक काम करीत आहेत. 

टॅग्स