दोन शेतकऱ्यांची बुलडाण्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

खामगाव / संग्रामपूर (जि. बुलडाणा) - पिंपळगाव नाथ (ता. मोताळा) येथील भास्कर शंकर साळोकार (वय 56) व शहापूर (ता. खामगाव) येथे सुखदेव मरी तिडके (वय 65) या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.

खामगाव / संग्रामपूर (जि. बुलडाणा) - पिंपळगाव नाथ (ता. मोताळा) येथील भास्कर शंकर साळोकार (वय 56) व शहापूर (ता. खामगाव) येथे सुखदेव मरी तिडके (वय 65) या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.

सततची नापिकी व कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने साळोकार यांनी शुक्रवारी (ता. 10) दुपारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. साळोकार यांच्याकडे स्टेट बॅंकेचे 80 हजार रुपये कर्ज होते. दुसऱ्या घटनेत तिडके यांनी काल सायंकाळी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर सेंट्रल बॅंकेचे 25 हजार रुपये कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पातुर्डा खुर्द (ता. संग्रामपूर) येथील दिगंबर ओंकार खंडेराव (वय 55) या शेतमजुराने झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.