अतिक्रमणावर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

महालात अस्थायी शेड तोडले, रस्ते केले मोकळे 

नागपूर - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज महालातील अस्थायी दुकानदारांना पळवून लावत रस्ते मोकळे केले. या कारवाईत दहा दुकानांचे शेड तोडण्यात आले. अस्थायी दुकाने हटविण्यात आली. 

महालात अस्थायी शेड तोडले, रस्ते केले मोकळे 

नागपूर - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज महालातील अस्थायी दुकानदारांना पळवून लावत रस्ते मोकळे केले. या कारवाईत दहा दुकानांचे शेड तोडण्यात आले. अस्थायी दुकाने हटविण्यात आली. 

महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली आहे. शहरभरात कारवाई करण्यात येत असून, आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान महाल परिसरात कारवाईस प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमणविरोधी पथक दिसताच रस्त्यांवरील हातठेल्यावरील वस्तू विक्रेत्यांनी पळ काढला. अतिक्रमणविरोधी पक्षकाने बडकस चौक ते कोतवाली रस्त्याकडे कूच केले. या मार्गावरील सर्वच दुकानांचे रस्त्यांवरील शेड तोडण्यात आले. झेंडा चौक मार्गावरील 10 दुकानांचे शेड तोडण्यात आले. कल्याणेश्‍वर मंदिर पुढील फळांची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फूल विक्रेत्यांना हटविण्यात आले. या मार्गावरील 35 अस्थायी दुकानदारांना हटविण्यात आले. नरसिंग टॉकीजलगत असलेल्या रेडीमेड कपड्यांच्या दुकानदारांना हटविण्यात आले. येथीलच एका चप्पल विक्री दुकानाचे शेड तोडण्यात आले. त्यानंतर, मेडिकल चौकातही कारवाई करण्यात आली. येथील ऊस रसाचा हातठेला मशीनसह जप्ती करण्यात आला. दोन लोखंडी टेबल जप्त करण्यात आले. एकूण एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सहायक आयुक्त अशोक पाटील तसेच कोतवालीचे पोलिस निरीक्षक तिजारे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. मंजूर शाह जमशेद अली आदींचा कारवाई पथकात समावेश होता. 

Web Title: unauthorised construction