बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला मिळाले काम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

नागपूर - महावितरणमधील विद्युतीकरणाची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना विनास्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यानुसार महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडळातर्फे 19 बेरोजगार अभियंत्यांना तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले. 

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महावितरणमधील कामे थेट लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या या उपक्रमांतर्गत महावितरणमधील विभागांतर्गत एकूण वार्षिक कामांपैकी सरासरी किमान 50 टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येणार आहेत. त्यानुसार नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली. या समितीत कार्यकारी अभियंता सुहास मेत्रे, कार्यकारी अभियंता एस. एस. सदामते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन जयस्वाल आणि उपकार्यकारी अभियंता जयंत ठाकरे यांचा समावेश आहे. समितीतर्फे नुकतीच कामांच्या वाटपासंदर्भात सोडत काढली. याप्रसंगी महावितरणची कामे करण्यास इच्छुक बेरोजगार अभियंतेही उपस्थित होते. सोडत काढून 19 बेरोजगार अभियंत्यांमध्ये तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांच्या कामांचे वाटप करण्यात आले.