चांगले घर जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त- राजन सॅम्युअल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नागपूर - एक चांगले घर, आरोग्य, शाळा, आर्थिक संधी आणि समाजात मिळून राहण्याची ऊर्जा देते. घर चांगले असेल तर जीवनमानाचा दर्जा उंचावणाऱ्या इतर घटकांचाही दर्जा वाढू लागतो, असे प्रतिपादन हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे कार्यकारी संचालक राजन सॅम्युएल यांनी केले. 

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन सीएसआर फोरमतर्फे "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उपाध्यक्ष असित सिन्हा उपस्थित होते. परिसंवादाचा विषय "इम्पॅक्‍ट विदर्भ : ए सीएसआर डायलॉग फॉर ट्रान्सफॉर्मिंग विदर्भ थ्रु हाउसिंग, वॉटर ऍण्ड सॅनिटेशन' हा होता. ते म्हणाले, भारतात परवडण्याजोगी घरे आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज आहे. या घरांची पूर्तता करण्यासाठी उद्योगजगताने आपल्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून मदत करावी. यातून खेडे किंवा जिल्हेच नव्हे तर पूर्ण देश बदलण्याची ताकद आहे. कुटुंबांना चांगले घर, स्वच्छतागृह मिळवून देण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी हॅबिटॅटने मदत केली. विदर्भात हॅबिटॅटने नागपूर, अमरावती आणि यवतमाळमध्ये घरे आणि स्वच्छतागृहे बांधली आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. संचालन संयोजक विजय पथे यांनी केले.