आमगावात आता ‘कॅशलेस’ व्यवहार

आमगाव - कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रताप वाघमारे, जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे, सुधाकर ढोणे, विजय कांबळे व आनंद कोठीवान.
आमगाव - कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रताप वाघमारे, जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे, सुधाकर ढोणे, विजय कांबळे व आनंद कोठीवान.

वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील आमगाव देवळी आणि या परिसरातील गांवाचा व्यवहार आता ‘कॅशलेस’ होणार आहे. विशेषतः व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांचे दैनंदिन व्यवहार डिजिटल होतील. नागपूर विभागातील अशाप्रकारचे हे पहिले गाव ठरले आहे, हे विशेष. 

‘माझे गाव डिजिलट गाव’ या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या विशेष अभियानातून या गावाची निवड झाली आहे. त्याचे श्रेय येथील कर्तव्यदक्ष बॅंक व्यवस्थापक लीशा देशभ्रतार यांना जाते. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे या गावाची निवड केल्याचे वरिष्ठ बॅंक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. डिजिटल गाव योजनेचा प्रारंभ शुक्रवारी दादासाहेब खडसे हायस्कूलच्या प्रांगणात काल पार पडला. 

अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य उज्वलाताई बोढारे होत्या.  जिल्हा परिषद सदस्य सुधाकर ढोणे, तहसीलदार प्रताप वाघमारे, महाराष्ट्र बॅंकेचे अचल प्रबंधक विजय कांबळे, उपअंचल प्रबंधक आनंद कोठीवान, आमगावच्या सरपंचा प्रतिभा गोमासे, सावंगीच्या अनुसया सोनवाणे व शाखा प्रबंधक लीशा देशभ्रतार उपस्थित होते. 

आर्थिक व्यवहार करताना त्यांना बॅंकेमध्ये येण्याची गरज भासू नये व आपल्या मोबाइलमधुन व्यवहार करता यावा, याविषयची माहिती विजय कांबळे यांनी दिली. आमगाव देवळी हे गाव डिजिटल झाल्याने हिंगणा तालुक्‍याला हा मान मिळाल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले. आमगाव देवळी हे गाव आदर्श गाव होणार असल्याचे मनोगत आनंद कोठीवान यांनी केले. 

ग्रामीण भागात नेटची समस्या आहे. त्यामुळे डिजिटल गावाचे स्वप्न पूर्णत्वास जात नाही. नोटाबंदीच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे हे गाव हे ख-या अर्थाने डिजिटल होत आहे, ही आनंदाची बाब आहे. असे मत उज्वलाताई बोढारे यांनी व्यक्त केले. प्रास्तविक शाखा प्रबंधक लीशा देशभ्रतार यांनी तर संचालन बॅंकमित्र रविंद्र पवार यांनी केले.

आभार निशा मेश्राम यांनी मानले. यावेळी सावंगीचे उपसरपंच अनिल क्षिरसागर, रशीद पठाण, दीलीप कोहळे, विमल लांजेवार, युवराज आकरे, अरुणा मोहतकरत, गजानन ढाकुलकर व गावातील नागरिक उपस्थित होते.

मांडवा येथे लवकरच ‘किसान लायब्ररी’ 
‘सकाळ’चा पुढाकार आणि लोकसहभागातून लवकरच नजीकच्या मांडवा या गावी ‘किसान लायब्ररी’ उभारण्यात येणार आहे. ‘‘आधुनिक शेती करायची असेल तर शेतक-यांना प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी गावातच शेतकऱ्यांसाठी अभ्यास केंद्र व्हावे’’, असे मत सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे यांनी यावेळी विचार मांडले. यावेळी वरिष्ठ वितरण व्यवस्थापक रुपेश मेश्राम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com