वर्धा: हनुमान टेकडीवर 'सकाळ'च्या वतीने वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

वर्धा : शहरातील हनुमान टेकडी परिसरात आज (रविवार) "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमात वेळी वैद्यकीय जनजागृती मंच, अन्य सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला. यावेळी "सकाळ'च्या वर्धा येथील विभागीय कार्यालयातील सहकारी, ग्रामीण बातमीदार, यिनचे सदस्य, मधुरांगणच्या सदस्या, तनिष्का मंचच्या सदस्या उपस्थित होत्या. वैद्यकीय जनजागृती मंच आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हनुमान टेकडीवर तयार होणाऱ्या हिरव्या आच्छादनात "सकाळ'नेही सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स
फोटो गॅलरी