वर्धा : सेलूतील पंचायत समिती कार्यालयात साचले पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पाणी साचले असून संगणक आणि कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.

सेलू (जि. वर्धा) - वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे येथील पंचायत समितीच्या कार्यालयात पाणी साचले असून संगणक आणि कार्यालयातील महत्वाच्या दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.

पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत चाळीस वर्षांपेक्षा जुनी आहे. ही इमारत संपूर्णत: मोडकळीस आलेली आहे. शनिवारच्या पावसाने इमारतीच्या छतावरील कवेलू फुटल्याने पाणी आत शिरले. शनिवारच्या पावसाने गटविकास अधिकाऱ्याचे कक्ष, पंचायत, आस्थापना विभाग आणि रेकॉर्ड रूममध्ये पाणी साचले. या कार्यालयांतील संगणक आणि महत्वाचे रेकॉर्ड पाण्यात भिजल्याची माहिती आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर इमारतीची डागडूजी करून छतावरील कवेलू काढून टिनपत्रे किंवा नवीन कवेलू टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. इमारतीच्या छतावरील कवेलू फुटलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही परिस्थिती असून तात्पुरती ताडपत्री टाकून वेळ निभावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. यावर्षी मात्र अधिकाऱ्यांनी छतावर तापडत्री टाकण्याचे सौजन्यही दाखविले नाही.

पंचायत समितीची इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत
पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीच्या प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर मंजुरीसाठी पडून असून तालुक्‍यातील, जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे या इमारतीच्या बांधकामाचा विषयात कोणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. इमारतीच्या दुरुस्तीकडे किंवा इमारत बांधण्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास महत्वाचे रेकार्ड हरविण्याचा भीती वर्तविण्यत येत आहे.

विदर्भ

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

02.30 AM

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांना हटविण्याची मागणी करण्यासाठी नागपुरातील...

12.30 AM

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017