'मॉर्निंग वॉक' करणाऱ्यांना भरधाव वाहनाने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

चंद्रपूर : शहरालगत महाऔष्णिक वीज केंद्रातील ऊर्जानगर वसाहत परिसर रविवारी अपघाताने हळहळला. पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव वाहनाने पर्यावरण चौकात सकाळी फिरायला निघालेल्या पाच जणांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तिघे गंभीर जखमी झालेत. मृतांत विठ्ठल दडमल (वय 40), प्रदीप धागमवार (वय 53) यांचा समावेश आहे. सुनील तुपेवार, भास्कर मुसळे, किशोर ठाकरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

चंद्रपूर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर ऊर्जानगर आहे. या भागात असलेल्या वसाहतीतील बहुतांशी नागरिक पर्यावरण चौक मार्गाने फिरायला जातात. रविवारीही वसाहतीतील अनेकजण फिरण्यासाठी गेले होते. सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव इकोस्पोर्ट मोटार पर्यावरण चौकाकडे येत होती. मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या पाच ते सात जणांना चिरडले. त्यानंतर हे वाहन पर्यावरण चौकातील पुलावर जाऊन आदळले.

या अपघातात विठ्ठल दडमल, प्रदीप धागमवार यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील तुपेवार, भास्कर मुसळे, किशोर ठाकरे हे गंभीर जखमी झाले. साईनाथ शेंडे आणि अन्य एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाले. अपघात घडताच संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनचालकाला बाहेर काढून चोप दिला. त्यानंतर अपघाताच्या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सचिन येलमुले, संपत शिंदे यांना अटक केली आहे.

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

रविवार, 20 ऑगस्ट 2017